वायरी भूतनाथ शाळेत मुलांना छत्री वाटप…

⚡मालवण ता.१२-:
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मातृत्व आधार फाउंडेशनचे आधारस्तंभ उद्योजक सागर वाडकर यांच्या सौजन्याने मातृत्व आधार फाउंडेशनच्या माध्यमातून मराठी जिल्हा परिषद शाळा, वायरी भूतनाथ नं. १ या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून उद्योजक सागर वाडकर यांच्या पुढाकारातून मातृत्व आधार मार्फत जिल्हा परिषद शाळांना शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहे. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो. या कार्यक्रमासाठी तहसीलदार सौ. वर्षा झालटे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. श्रद्धा देऊलकर यांनी प्रास्ताविक मांडून शाळेची सद्य परस्थिती मांडली, त्यानंतर संस्थापक संतोष लुडबे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते सागर वाडकर यांनी कार्यक्रमाचे उद्देश, प्रयोजन सांगितले.

या कार्यक्रमासाठी बहुसंख्य पालक वर्ग, गावकरी, तसेच संतोष नागवेकर, सूर्यकांत कदम, संदीप लुडबे, मनोज खोबरेकर, कृष्णा साळसकर, संजय हंजनकर, विरेश देऊलकर, गणेश लुडबे, विजय तळगावकर बबन गावकर, सौ. प्रिया राणे, सौ. शिल्पा खोत, सौ. भारती वाईरकर, सौ. प्रतीक्षा लुडबे, दीक्षा लुडबे, सौ. गौरी सातार्डेकर, जयमाला मयेकर, वायरी सरपंच भगवान लुडबे, उपसरपंच सौ. प्राची माणगावकर शाळेतील सर्व शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आदी बहुसंख्य उपस्थित होते. शेवटी सौ. तांबे यांनी मातृत्व आधार आणि मान्यवरांचे आभार मानले. त्यानंतर जिल्हापरिषद शाळा तारकर्ली या ठिकाणी देखील सुमारे ३१ मुलांना छत्री वाटप करण्यात आले.

You cannot copy content of this page