कुडाळ : शासनाकडून विविध पर्यावरण विषयक उपक्रम घेतले जातात . या उपक्रमातून वृक्ष लागवड वृक्ष जतन हा मुख्य संदेश दिला जातो . एक पेड मा के नाम हा उपक्रम पाट विद्यालयात राबविण्यात आला. यासाठी मुले आणि माता पालक यांना एकत्र करून वृक्ष जतन वृक्ष लागवडीचा संदेश देण्यात आला .या उपक्रमातून मुलांना वृक्षाबद्दल प्रेम निर्माण होईल पर्यावरणाची आवड निर्माण होईल याकरिता पाट हायस्कूल मध्ये ही जाणीव जागृती करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक राजन हंजनकर पर्यवेक्षक सयाजी बोंदर उपक्रम प्रमुख संदीप साळसकर सौ चव्हाण एस .जी .माता-पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्व संस्थाचालक आणि पालकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. राष्ट्रीय हरित सेना आणि इको क्लब यांच्यामार्फत वर्षभर विविध उपक्रम पर्यावरण विषयक जनजागृती करिता पाट हायस्कूलमध्ये राबविले जातात . त्यामुळे परिसरात चांगल्या प्रकारचे वृक्ष लागवडीचा परिणाम झालेला दिसतो .
पाट हायस्कूलमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाची जनजागृती…
