पाट हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश…

दहा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक..

⚡कुडाळ ता.११-: एस्. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी,पाट संचलित एस्. एल्.देसाई विद्यालय पाट कै.सौ. एस्. आर्. पाटील कनिष्ठ महाविद्यालय व कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य ,विज्ञान उच्च महाविद्यालय तथा कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमधील सन 2024-2025 फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तब्बल दहा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करून प्रशालेला गुरुपौर्णिमा — व्यास पौर्णिमेदिवशी अनमोल अशी गुरुदक्षिणा दिली.


शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी पुढील प्रमाणे – पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती धारक —इयत्ता पाचवी1) उत्कर्षा प्रवीण केरकर 222 /300 2) गौरेश सुंदर गावडे 216/ 300
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी 1)कस्तुरी संतोष खानोलकर 214/ 300 2)मिहीर विजय मेस्त्री 194/ 300 3)रिया राजन राऊळ 194 /300 4)जागृती ज्ञानेश्वर राऊळ 190/300 5) अंतरा शंभू मोंडकर 182 /300 6)मिताली नरसिंह भगत 180 /300 7) चिन्मयी शशिकांत सकरे 164 /300 8)कार्तिकी शामसुंदर मोंडकर 164/ 300 . या सर्व इयत्ता आठवी मधील विद्यार्थ्यांना ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे .
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालकांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत, कार्याध्यक्ष देवदत्त साळगांवकर,सचिव विजय ठाकूर, संस्था सदस्य राजेश सामंत व सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले.
या शिष्यवृत्ती प्राप्त सर्व विद्यार्थ्यांना गुरुनाथ केरकर, दीपिका सामंत, रमेश ठाकूर अंकिता मोडक ,सिद्धी चव्हाण , प्रियांका नागोळकर, मारुती सांगळे, विनायक कांबळे, प्रशांत जाधव, जाह्नवी पडते, नंदिनी बुरुड, या तज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती प्रमुख म्हणून सिद्धी चव्हाण व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती प्रमुख म्हणून मारुती सांगळे यांनी काम पाहिले.
प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर व पर्यवेक्षक सयाजी बोंदर, ज्येष्ठ शिक्षक संदीप साळसकर व तानाजी काळे यांनीही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे व प्रशालेतील मार्गदर्शक शिक्षकांचे गुलाब पुष्प देऊन प्रशाला व संस्थेच्या वतीने विशेष कौतुक केले.

You cannot copy content of this page