वेंगुर्ले भटवाडी-आडीपुल येथे एसटी बस व आयशर टेम्पो समोरासमोर धडकल्याने अपघात…!

⚡वेंगुर्ले ता.०३-: वेंगुर्ले आगाराच्या सकाळी 8 वाजता सुटलेल्या वेंगुर्ले कुडाळ कणकवली मार्गे स्वारगेट वल्लभनगर येथे एम.एच.-13- सीयु -7845 ही पुण्यात प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस व कोल्हापूर येथून वेंगुर्ले शहरात येणारा आयशर टेम्पो एम.एच.-34- बी. झेड.- 6952 यांची सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास आडीपूल-भटवाडी स्टॉप नजीकच्या वळणावर समोरासमोर धडक बसली. या अपघातात एसटी बसमधील चालकासह 9 प्रवासी किरकोळ जखमी झाले तर तीन प्रवाशांना डोक्याला व नाकाला दुखापती झाल्या. या सर्व दुखापती झालेल्या प्रवाशांना वेंगुर्लेतील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराठी दाखल करण्यात आले. किरकोळ जख्मीवर उपचार करून त्यांना सोडवण्यात आले तर डोक्यास व नाकास दुखापती झालेल्या तीन प्रवाशांना जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलविण्यात आले आहे. या बसमधील पुढे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची व्यवस्था वेंगुर्ले आगारातर्फे करण्यात आली.
या अपघातात दोन्ही गाड्यांचे समोरील बाजूचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती समजताच वेंगुर्ले आगाराचे अधिकारी व वेंगुर्ले पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.
या अपघात प्रकरणी आयशर टेम्पो चालक विनोद साह यांनी वेंगुर्ले पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार व पोलीस पंचनाम्यानुसार बस चालक ज्ञानेश्वर पालकर यांचेवर मोटर व्हेईकल अँक्ट नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हेड काँन्स्टेबल भगवान चव्हाण करीत आहेत.

You cannot copy content of this page