⚡सावंतवाडी ता.०३-: गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत तालुका आणि जिल्हा गुणवत्ता यादीत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अव्वल गुण प्राप्त करुन घवघवीत यश संपादन केले.
जिल्हा गुणवत्ता यादीत इयत्ता सहावीचा विद्यार्थी
सर्वेश नितीन गावडे तसेच
तालुका गुणवत्ता यादीत
अर्णव अमोल माने इयत्ता सहावी
विराज शशिकांत गवस इयत्ता सहावी
गौरांग संदीप पेडणेकर इयत्ता सातवी
तेजस दयानंद आर्दळकर इयत्ता सातवी
चैतन्य गणेश पवार इयत्ता सातवी या विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान प्राप्त केले. सिंधुदुर्ग सैनिक स्कूल येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनी NDA परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थी पूर्व तयारीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा,ऑलिम्पियाड परीक्षा देतात. गुणवंत विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष सुनील राऊळ, संचालक जाॅय डांटस, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे,सर्व संचालक आणि पालकांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे घवघवीत यश…!
