रायफल शूटिंग मध्ये अवनी भांगले अव्वल …

⚡सावंतवाडी ता.०३-: मीलाग्रिस हायस्कूल, सावंतवाडी या प्रशालेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी अवनी मेघश्याम भांगले हिने दिनांक २७ जून ते २९ जून २०२५ या कालावधीत गोवा येथे आयोजित सातव्या शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत दहा मीटर पिस्टॉल या क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन करून या शूटिंग स्पर्धेमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले.

तिने वैयक्तिक चॅम्पियनशिप युथ वुमन तसेच चॅम्पियनशिप सब युथ वुमन या गटातून विजय संपादन करीत या दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
तिच्या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक रे .फादर रिचर्ड सालदाना यांनी तसेच पर्यवेक्षिका श्रीमती संध्या मुणगेकर तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग व विद्यार्थी या सर्वांनी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिला उपरकर शूटिंग रेंजचे प्रशिक्षक कांचन उपरकर प्रशालेचे क्रीडा शिक्षक शेरॉन अल्फान्सो हितेश मालणकर यांचे मार्गदर्शन
लाभले.

You cannot copy content of this page