एलसीबीने टाकला छापा ; एकावर गुन्हा दाखल..
कणकवली : राहत्या घराच्या देवघरात लपवून ठेवलेला गांजा एलसीबी सिंधुदुर्ग च्या पथकाने जप्त केला असून कणकवली तालुक्यातील वारगाव (रोडेवाडी) येथील प्रविण उर्फ बबन आत्माराम गुरव (वय ५५ ) यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार पीएसआय अनिल हाडळ, पीएसआय रामचंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली हवालदार सदानंद राणे, हवालदार डॉमनिक डिसोझा, हवालदार किरण देसाई, हवालदार बस्त्याव डिसोझा, हवालदार विल्सन डिसोझा, हवालदार जॅक्सन घोंसालविस, हवालदार आशिष जमादार, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती सावंत यांच्या पथकाने १ जुलै रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास केली. आरोपी प्रवीण गुरव याने आपल्या घरात अंमली पदार्थ गांजा साठा ठेवल्याची माहिती एलसीबी ला मिळाली होती. त्यानुसार एलसीबी च्या पथकाने संशयित प्रवीण उर्फ बबन गुरव याच्या घरावर १ जुलै रोजी छापा टाकला. तपासणी केली असता घरातील देवघरात बबन गुरव याने लपवून ठेवलेला ११२ ग्रॅम वजनाचा ३ हजार २०० रुपये किंमतीचा गांजा आढळून आला. त्यानुसार हवालदार आशिष जमादार यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी प्रवीण उर्फ बबन गुरव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.