⚡कणकवली ता.०२-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे वडील भास्कर दिगंबर पारकर (वय वर्षे ८३) यांचे आज पहाटे ६ वा.च्या सुमारास निधन झाले. काहि दिवस अल्पशा: आजाराने आजारी असल्याने त्यांच्या येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालावली. अलीकडेच दोन महिन्यांपूर्वी संदेश पारकर यांच्या आईचे निधन झाले होते. दोन महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा पारकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, समीर पारकर यांचे ते वडील होत. आज दुपारी १२:३० वाजता येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.