⚡मालवण ता.०२-: भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आमदार रवींद्र चव्हाण यांची मंगळवारी नियुक्ती झाल्यानंतर भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या निवडी बद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर म्हणाले, कोकणचा सुपुत्र राष्ट्रीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो ही अभिमानाची गोष्ट आहे. रवींद्र चव्हाण हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पाठबळ देणारे व जपणारे नेते आहेत. चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष बनल्याने भारतीय जनता पक्षाची ताकद सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढणार, त्यांनी जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून केलेले काम जनतेच्या लक्षात असून जिल्ह्याच्या विकासात चांगले योगदान दिलेले आहे असे सांगितले
यावेळी महेश मांजरेकर, संतोष गावकर, दीपक सुर्वे, विजय निकम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.