⚡मालवण ता.०१-:
भारतीय जनता पार्टीचा विजय असो… प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विजय असो… खासदार नारायण राणे यांचा विजय असो… पालकमंत्री नितेश राणे यांचा विजय असो… या घोषणानी मालवण शहर पिंपळपार परिसर दणाणून गेला. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड जाहीर होताच मालवण भाजपा कार्यालय येथे भाजपा पदाधिकारी यांनी जल्लोष केला. मालवण शहर पिंपळपार येथे फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सौरभ ताम्हणकर, अशोक तोडणकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, बबन परुळेकर, अशोक चव्हाण, बबन परुळेकर, उद्योजक केदार झाड, कुंभारमाठ उपसरपंच जिवन भोगावकर, दिलीप सांगावेकर, दादू डिचोलकर, गणेश सातार्डेकर, शाम झाड, राम चोपडेकर, संदीप बोडवे, किशोर खानोलकर,नंदू देसाई, रवी टेंबूलकर, देवेंद्र चव्हाण, जयवंत सावंत यांसह अन्य पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी माजी नगरसेविका पुजा करलकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, माजी नगरसेविका महानंदा खानोलकर, आनंदव्हाळ सरपंच रश्मी टेंबूलकर, अमिता निवेकर, वैष्णवी मोंडकर, राणी पराडकर, तारका चव्हाण, चित्रा हरमलकर, स्मिता प्रभाळे, नंदिता हडकर, अपर्णा सावंत यांसह अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो :
भाजपा प्रदेशाध्यक्ष पदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्यानंतर मालवण येथे भाजपा पदाधिकारी यांनी जल्लोष केला.