⚡बांदा ता.०१-: मडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महाराष्ट्र कृषी दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी व प्रयोगशील शेतकरी प्रतीक वालावलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कृषी दिनाची माहिती देण्याबरोबरच झाडे कशी लावावीत. त्यांची निगा कशी राखावी याचे प्रात्यक्षिकही दाखवले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले.
वेगवेगळ्या औषधी वनस्पती, उपयुक्त झाडांची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी विलासिनी शेर्लेकर, सौ श्रुती रेडकर यांच्यासह मुख्याध्यापिका नीती साळगावकर, सहाय्यक शिक्षिका हर्षदा तळवणेकर, वेलांकनी रोड्रिक्स, स्वरा राठवड, मयुरी कासार, शिवानी शेळके आदी उपस्थित होते.
फोटो:-
मडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये कृषी दिन साजरा करण्यात आला.
मडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये कृषी दिन उत्साहात साजरा…!
