मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचा जागतिक अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीत सहभाग…

⚡सावंतवाडी ता.२६-: जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त गुरुवार दिनांक 26 जून 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने आयोजित अंमली पदार्थ विरोधी प्रभातफेरी व जनजागृती कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी चे इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले. अंमली पदार्थ विरोधी प्रभातफेरी भोसले उद्यान ते गांधी चौक सावंतवाडी या दरम्यान आयोजित करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृतीपर घोषणा दिल्या आणि घोषफलकांद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. या रॅलीत पोलीस निरीक्षक मा.अमोल चव्हाण यांच्यासह चार अंमलदार सहभागी झाले.
सदर उपक्रमाची सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक अॅडव्होकेट शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉक्टर श्री.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी प्रशंसा केली.

You cannot copy content of this page