आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 ‌‌ श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी. (स्वायत्त) येथे साजरा…

⚡सावंतवाडी ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे दिनांक 21 जून 2025 रोजी आंतरराष्र्टीय योग दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या एनएसएस, एनसीसी,डी.एल.एल.ई आणि क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा.एम. ए. ठाकूर होते.या वेळी एनएसएस कार्यक्रमाधिकारी डॉ. यू. सी. पाटील , डॉ. सुनयना जाधव , प्रा. रोहन सावंत ,एनसीसी ANO डॉ. सचिन देशमुख , डॉ. विशाल अपराध ,CTO प्रा.सौ.कविता तळेकर ,आय.क्यु.ए.सी समन्वयक डाॅ. बी.एन. हिरामणी, वनस्पतीशास्र विभागप्रमुख डाॅ.यु.एल देठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
योग प्रशिक्षक म्हणून प्रदीप्ती कोटकर व रिया सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभारी प्राचार्य प्रा.एम. ए. ठाकूर यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाली. त्यांनी आपल्या भाषणात योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे फायदे, तसेच विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करण्याचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.
यानंतर योग प्रशिक्षक प्रदीप्ती कोटकर व रिया सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान प्रकार शिकविण्यात आले.
या वेळी विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा.कविता तळेकर यांनी सर्वांना नियमित योगसाधनेचे महत्त्व पटवून दिले आणि ऊपस्थितांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएस, एनसीसी , डी.एल.एल.ई व क्रीडा विभागाच्या स्वयंसेवकांनी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page