माजी शिक्षण मंत्री आम. दीपक केसरकर यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

मुंबई : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा देत अभीष्टचिंतन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर हे देखील उपस्थित होते.
मंत्री नितेश राणे यांचा सोमवार २३ जून रोजी वाढदिवस असून ते सोमवारी जिल्हा दौऱ्यावर आहेत. कणकवली येथील निवासस्थानी ते शुभेच्छा स्वीकारणार आहेत. या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला राणेंच्या मुंबई जूहू येथील अधिश बंगल्यावर भेट घेत आमदार दीपक केसरकर यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page