माड्याची वाडी विद्यालयाचा अभिनव उपक्रम…

शाळा प्रवेशाचे औचित्य..

कुडाळ : एस.के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याची वाडी या प्रशालेत शाळेची सुरुवात एका अनोख्या उपक्रम द्वारे करण्यात आली. सर्व विद्यार्थांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
सुरुवातीला आठवी मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. सर्व नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थाचे पुष्प देवून स्वागत करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक अनंत सामंत यांनी नवीन विद्यार्थांना प्रशालेचे सर्व नियम समजून दिले. त्यानंतर सर्व विद्यार्थांच्या हस्ते शाळेचं विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. आठवीच्या सर्व ३६ विद्यार्थांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली हे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गावातील काही ग्रामस्थ सुद्धा उपस्थित होते. सुरुवातीला सर्वाना वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून देण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थांना आपल्या आपल्या घरच्या परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी आवाहन करण्यात आले.
या अभिनव उपक्रमाचे संस्था पदाधिकार्यांनी कौतुक केले. या प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page