माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या पाठपुराव्यामुळे पायवाटेवर पेव्हर ब्लॉक चे काम मार्गी…

मालवण (प्रतिनिधी)

गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी असलेल्या मालवण शहरातील जुन्या हॉटेल बांबू नजीकच्या पायवाटेवर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी मालवण नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी प्रयत्न करून तत्कालीन लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून सततचा पाठपुरावा केला होता.

सदर पायवाटेचे काम अनेक वर्षे प्रलंबित होते. माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या प्रयत्नाने हे काम पूर्ण झाल्याने स्थानिक नागरिक समीर मालवणकर, पूजा पराडकर, संगिता मालवणकर, संजय खाडिलकर, अंजु खोत, गणपत हिंदळेकर, आनंद दामले, अरविंद दामले, भक्ती दामले, विलास हिंदळेकर, सरिता साळकर, विनोद रेवंडकर, प्रथमेश करंगुटकर, सिद्धेश करंगुटकर, सरिता करंगुटकर यांनी समाधान व्यक्त करत यतीन खोत यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page