पाट हायस्कूलमध्ये ग्राफिक डिझाईनचे मार्गदर्शन…

कुडाळ : कला क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. कला महाविद्यालयात दोन वर्षांपूर्वी घेतलेले शिक्षण आज काल्यबाह्य होत आहे. नवनवीन ॲप्स नवनवीन सॉफ्टवेअर यामुळे कलाक्षेत्रासोबत चालताना मुलांची दमछाक होत आहे . पण काळासोबत जो चालतो तोच या स्पर्धेत टिकतो, हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे कलाक्षेत्रातील बदलाबाबत मार्गदर्शन करण्याकरिता मुंबई येथे कार्यरत असणारे ग्राफिक डिझायनर आणि पाट हायस्कूलचे माजी विद्यार्थी राजेश म्हापणकर यांचे अनमोल मार्गदर्शन पाट हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना लाभले.
आजचे जग रोज नवीन शोध रोज नवीन विचार रोज नवीन वेध घेत आहे. बदलाचे वारे लक्षात घेता आपणासही बदल करणे आवश्यक आहे . कलाक्षेत्रात नवे काही घडावे असे वाटत असेल तर तसा बदल कला शिक्षण देणाऱ्या संस्थानी केला पाहिजे.
राजेश म्हापणकर यांनी कलाक्षेत्रातील आपली वाटचाल कशी झाली ते मुलांना सांगितले. त्याचप्रमाणे आज आपण करत असलेल्या कामाची रंगीत चित्रही मुलांना दाखवली. कला विषयातून पाट हायस्कूल मधून घडलेली मुले आज कोणकोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्याचाही आढावा घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन कलाशिक्षक संदीप साळसकर यांनी केले होते. राजेश म्हापणकर यांचे स्वागत आणि या कार्यक्रमाचे आभार सयाजी बोंदर सर यांनी केले.

You cannot copy content of this page