⚡बांदा ता.१८-: महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत पीएम श्री बांदा नं.१केंद्र शाळेत चार विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले. गणित अध्यापक मंडळाच्या वतीने दरवर्षी गणित संबोध , प्राविण्य व प्रज्ञा अशा टप्प्याने परीक्षा घेण्यात येतात .अत्यंत कठीण असलेल्या गणित प्रज्ञा परीक्षेत बांदा केंद्र शाळेतील दुर्वा दत्ताराम नाटेकर,स्वरा दिपक बांदेकर, तन्वी यशवंत साईल, स्वामिनी लक्ष्मण तर्पे हे चार विद्यार्थी अंतिम परीक्षेला पात्र ठरले होते या चारही विद्यार्थ्यांनी रौप्य पदकासह अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेचा नावलौकीक वाढविल्य बद्दल बांदा सरपंच प्रियांका नाईक.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्ष संपदा सिध्दये, मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी अभिनंदन केले असून या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत, पदवीधर शिक्षक उदय सावळ, उपशिक्षक जे.डी.पाटील, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस , स्नेहा घाडी, जागृती धुरी, मनिषा मोरे, कृपा कांबळे, सुप्रिया धामापूरकर यांचें मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या अधिवेशनात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत बांदा केंद्र शाळेचे घवघवीत यश…!
