सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे सी ई ओ यांना निवेदन..
सिंधुदुर्गनगरी ता १७
सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त शिक्षकांचे माहे मे महिन्याचे निवृत्तीवेतन अद्याप मिळालेले नाही .याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच शासन निर्णयाप्रमाणे दरमहा १ तारीखलाच निवृत्ती वेतन मिळावे. अशी मागणी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्तीवेतन होण्यास विलंब झाला आहे. जून महिना संपत आला तरी अद्याप निवृत्तीवेतन मिळाले नसल्याने संघटनेचे अध्यक्ष शरद नारकर, सरचिटणीस नितीन जठार, जिल्हा कार्याध्यक्ष डी .बी रेडकर, राज्य उपाध्यक्ष जी बी चव्हाण, यांच्यासह जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकानी आज वित्त अधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याकडून निवृत्ती वेतन अद्याप का झाले नाही याची खात्री करून त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले. शिक्षणाधिकारी यांनी निवृत्ती वेतन आज जमा होईल, असे सांगितले असले तरी निवृत्ती वेतन देण्यास विलंब का झाला? त्याला जबाबदार कोण? असा जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून त्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन शासन निर्णयानुसार दरमहा १ तारीखला करण्यात यावे, सेवानिवृत शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव सेवानिवृत्तीपूर्वीपासूनच प्रलंबित आहेत ते तात्काळ मंजूर होऊन वेतनामध्ये सुधारणा करण्याबाबत अंमलबजावणी व्हावी, शासन निर्णयानुसार ३० जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक काल्पनिक वेतन वाढ देऊन सेवानिवृत्ती प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, वय वर्ष ८० ते १०० पूर्ण केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतन शासन निर्णयाप्रमाणे वाढ होऊन त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी. आदी मागण्या या निवेदनातून केल्या आहेत.