निकुष्ठ विकास कामांबाबत आंदोलनाची दिशा ठरणार..
कुडाळ : वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील बुद्धिजीवी व अराजकीय सामान्य नागरिकांचा नगरपरिषदेच्या विरोधातील निर्णायक लढ्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी वेंगुर्ला शहर नागरी कृती समिती, वेंगुर्ला आयोजित दिनांक 11/6/2025 रोजी दुपारी ठीक 3 वाजता गणपती मंदिर, प्राथमिक शाळे शेजारी, कॅम्प भटवाडी येथे शहरातील बुद्धिजीवी आणि अराजकीय सामान्य नागरिकांची अत्यंत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत नगरपरिषद, वेंगुर्ला यांनी निवडक कंत्राटदारांना हाताशी धरून केलेली चुकीची, निकृष्ट, दर्जाहीन, बोगस आणि अर्धवट विकासकामे या गंभीर विषयांवर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.
तसेच नगरपालिकेकडे वारंवार विविध तक्रार अर्ज, मागण्या आणि विनंती पत्रे देऊनही शहरातील 15% पेक्षा अधिक नागरिकांची जाणीवपूर्वक हेळसांड केली जात असून सध्या आम आदमीच्या मनात प्रचंड असंतोष वाढलेला आहे आणि त्याविरोधात लवकरच निवडक नागरिकांचा धडक मोर्चा नगरपरिषदेवर नेण्याचा मानस अनेक महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांनी बोलून दाखविला आहे..
तरी उद्या गणपती मंदिर, कॅम्प भटवाडी येथे होणाऱ्या महत्वाच्या बैठकीस शहरातील 17 ही वॉर्डच्या पीडित आणि वंचित सामान्य नागरिकांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला शहर नागरी कृती समितीने केले आहे..