आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत मालवणच्या सौ क्षमा रेडकर हिचे यश…

⚡मालवण ता.१०-:
श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या इंटरनॅशनल मास्टर्स ऍथलेटीक्स स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व करताना विविध खेळात यश मिळवीत पदकांची लयलूट केली. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस अंमलदार आणि मालवणच्या स्नुषा सौ. क्षमा मधुकर रेडकर यांनी ६० वर्षा वरील महिला गटात ३००० मीटर धावणे प्रकारात रौप्य पदक तर १५०० मीटर धावणे प्रकारात कांस्य पदक पटकावत महाराष्ट्रासह मालवण आणि मुंबई मरोळ विभागाचे नाव रोशन केले आहे.

या स्पर्धेत शशिकांत जितेकर यांनी ५० वर्षावरील पुरुष गटात भालाफेक मध्ये सुवर्ण पदक, आनंद जितेकर यांनी ४५ वर्षावरील पुरुष गटात भालाफेक मध्ये सुवर्णपदक, थाळीफेक मध्ये कांस्य पदक, दारा सिंग यांनी ५५ वर्षावरील पुरुष गटात भालाफेक मध्ये सुवर्णपदक, वसुंधरा पिटलेवार यांनी ५० वर्षावरील महिला गटात २००० मीटर स्ट्रिपल चेस मध्ये सुवर्ण पदक, ८० मीटर हर्डल व ३०० मीटर मध्ये रौप्य पदक, रेणू सिंधू यांनी ४५ वर्षावरील महिला गटात ८०० मी. १५०० मी. व ५००० मीटर धावणे मध्ये रौप्य पदक, भगवान बोथे यांनी हातोडा फेक मध्ये रौप्य पदक, ६५ वर्षावरील पुरुष गटात उत्तम माने यांनी लांब उडीमध्ये कांस्य पदक व अरविंद संगर यांनी हातोडा फेक मध्ये कांस्य पदक, संतोष पवार यांनी ५५ वर्षावरील पुरुष गटात ४०० मीटर हर्डल मध्ये कांस्य पदक पटकाविले. तर अमित विचारे, रोहित सचिन जगताप, डॉ. पौर्णिमा मयेकर, शिवानंद शेट्टी यांनीही विविध खेळात कांस्य पदक मिळवीत यश प्राप्त केले.

You cannot copy content of this page