⚡मालवण ता.०९-:
‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५’ निमित्त सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था आणि मालवण तालुक्यातील नागरी, ग्रामीण बिगरशेती व कर्मचारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ जून रोजी दैवज्ञ भवन येथे सहकारी संस्थांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेत सकाळी १० ते १०.१५ वा. प्रस्तावना, १०.१५ ते १०.३० दीपप्रज्वलन व स्वागत, १०.३० ते ११.३० वा. मालवण तालुक्यातील सर्व सहकारी पतसंस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार समारंभ, ११.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत ‘ताणतणाव व्यवस्थापन’ या विषयावर प्रख्यात योग प्रशिक्षक अशोक देशमुख यांचे मार्गदर्शन, १२.३० ते १.१५ वा. पतसंस्थेच्या संचालक मंडळांचे अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या या विषयावर सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांचे मार्गदर्शन, १.१५ ते १.३० वाजेपर्यंत वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष मंदार सांबारी ‘सहकार’ वरील कविता सादर करणार आहेत. दुपारी १.३० वाजता स्नेहभोजन, दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत नेत्रतपासणी व रक्ततपासणी आरोग्य शिबीर संपन्न होणार आहे. सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.