पुलाच्या दुरुस्तीचे कामाचाही शुभारंभ..
मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील पोईप – विरण बाजारपेठेतील वाहतुकीस ना दुरुस्त झालेल्या विरण पोईप जोडणाऱ्या पुलाची कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांनी सोमवारी सकाळी प्रत्यक्ष पाहणी करीत पुलाच्या दुरुस्तीच्या कामाचाही शुभारंभ पार पडला
काही दिवसांपूर्वी मालवण बेळणे मुख्य मार्गावरील विरण पोईप ला जोडणाऱ्या फुलाची संरक्षक भिंत कोसळून पुलावरून अवजड वाहतूक बंद झाली होती बंद झाली होती याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे या पुलाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाबाबत मागणी केली होती दत्ता सामंत यांनी याबाबत आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास सदर पुलाचा विषय आणून देऊन सोमवारी आमदार निलेश राणे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या पुलाची पाहणी केली यावेळी वाहतुकीची गैरसोय होत असल्याने कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता पुलाचे काम सोमवारपासूनच सुरू करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या व काम पूर्ण झाल्यावर निकष प्रमाणे पुलाचे अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा अशी सूचना दिली.
मागील काही दिवसांपासून पुलाची संरक्षक भिंत कोसळल्याने या पुलावरून अवजड वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. या पुलावरून सध्या एकेरी वाहतूक चालू असून आता काही दिवसात हायस्कूल व शाळा होणार असल्याने वाहतुकीसाठी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे यामुळे या भागातील माजी जि.प. बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी पुलाच्या दुरुस्तीबाबत दत्ता सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
या पुलाच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत माजी जि.प. बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी जिल्हाप्रमुख संजय पडते, राजेंद्र प्रभुदेसाई, सुनील घाडीगावकर, पोईप सरपंच श्रीधर नाईक, पंकज वर्दम, जितेंद्र परब, प्रशांत परब, कांता चव्हाण, दत्ताराम आंबेरकर, विलास पांजरी, मोहन पांजरी, दयानंद प्रभूदेसाई, गोपीनाथ पालव, विलास माधव, सचिन पालव, दाजी येरम, नारायण उर्फ पप्पू राणे, संदीप सावंत, सत्यवान पालव, अशोक पालव, महेश पालव, सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता अजित पाटील, कनिष्ठ अभियंता पुरुषोत्तम भोये, व पोईप विरण मधील शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते
