शिवसेनेची जिल्ह्यात मुसंडी…

आम. निलेश राणे:शिवसेनेच्या नवीन नेमणुका जाहीर..

⚡कुडाळ ता.०९-: शिवसेना शिंदे गट कार्यकारिणीच्या नवीन नेमणूका आज आमदार निलेश राणे आणि जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी जाहीर केल्या. जुनी कार्यकारिणी पूर्णपणे बरखास्त करून नवीन नेमणुका करण्यात आल्या असून विधानसभा प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख या नेमणुका पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन लवकरच जाहीर करू असं जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी जाहीर केलं तर जिल्ह्यात शिवसेनेन जोरदार मुसंडी मारली असल्याचं आमदार निलेश राणे म्हणाले. यावेळी निलेश राणे यांनी आगामी निवडणूका, ठाकरे बंधूंचं एकत्र येणं, निवडणुका स्वतंत्र लढणार का, लहानभाऊ-मोठा भाऊ यावर सुद्धा भाष्य केले.
शिवसेना पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस, उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहे. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी नवीन कार्यकारणी निर्माण करण्यात येत आहे अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नूतन कार्यकारणी जाहीर केली यामध्ये जिल्हा सरचिटणीसपदी दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख तालुका व शहर प्रमुखांची निवड जाहीर करण्यात आली.
शिवसेनेची जुनी कार्यकारणी रद्द झाल्यानंतर नूतन कार्यकारणी निर्माण करण्यात आली आहे. या संदर्भात आमदार निलेश राणे यांनी कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, दादा साईल, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेमध्ये आमदार निलेश राणे म्हणाले, शिवसेना पक्षाची वाढ मोठ्या प्रमाणावर होत आहे. पूर्वीपासून हा जिल्हा शिवसेनेचा होता. या जिल्ह्यामध्ये सध्या दोन आमदार हे शिवसेनेचे आहेत आणि उबाठा व काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे पक्ष वाढत आहे. कोणाच्या टीकेकडे लक्ष न देता आम्ही कामावर लक्ष दिलं आहे असे सांगून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी नवीन कार्यकारणी निर्माण करण्यात आली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे नेते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. तरी आपली तयारी असणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही आमच्या पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहोत. असे त्यांनी यावेळी सांगून नवीन कार्यकारणी नियुक्ती बाबत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे घोषणा करतील असे यावेळी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः शालेय आरोग्य आणि विजेचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. केवळ कोणतीही गोष्ट दिखाऊ न करता सर्वांना यामध्ये अधिक चांगली सेवा कशी देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत. दरम्यानच्या कालावधीत या महत्त्वाच्या प्रश्नाकडे निधी आला नाही तो निधी माझ्यासह खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ग्रामीण भागात शिवसेना अधिक बलाढ्य कशी होईल, या दृष्टिकोनातून आमचे काम चालू असणार आहे. तसेच बूथप्रमुख, शाखाप्रमुख लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

नवीन कार्यकारणी झाली जाहीर

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नूतन कार्यकारणी जाहीर केली यामध्ये जिल्हास्तरावरील जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर (कुडाळ), महेश राणे (मालवण), महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते. ओरोस मंडळ अध्यक्ष दीपक नारकर, कुडाळ मंडळ अध्यक्ष विनायक राणे, मालवण मंडळ अध्यक्ष राजा गावडे, मालवण मंडळ अध्यक्ष विनायक बाईत, कुडाळ शहर प्रमुख ओंकार तेली, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, मालवण उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर यांची नियुक्ती करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा आमदार निलेश राणे यांनी दिल्या.

You cannot copy content of this page