⚡सावंतवाडी ता.०९-: श्री संत गाडगे महाराज परिट समाज, सिध्दुदुर्ग यांच्या वतीने परिट समाजातील दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ रविवार, दिनांक २२ जून २०२५ रोजी संध्याकाळी ३.०० वाजता कपकवली येथील श्री संत भालचंद्र महाराज आश्रम येथे आयोजित करण्यात आला आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात होणार असून, ज्यांनी आपली नावे यापूर्वी दिली आहेत, त्यांनी तसेच त्यांचे पालक, तसेच समाजाचे प्रदेश व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, महिला व युवक विभागाचे पदाधिकारी, तालुका कार्यकारिणी सदस्य आणि इतर समाजबांधव यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री संत गाडगे महाराज परिट समाज, सिध्दुदुर्ग चे अध्यक्ष मा. श्री. दिलीप भालेकर यांनी केले आहे.
या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना समाजाचे सचिव श्री. अनिल शिवडाक्कर यांनी सांगितले की, समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हा महत्वाचा घटक असून, या विद्यार्थ्यांचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी आहे. समाजाच्या युवकांना प्रेरणा मिळावी, हाच यामागचा उद्देश आहे.
