*💫कणकवली दि.२९-:* जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र व युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे मार्फत मोफत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. दिनांक ५ डिसेंबर २०२० पासुन कणकवली कॉलेज कणकवली येथे सुरु होणारे हे मोफत प्रशिक्षण राज्य सरकारची पोलिस भरती होईपर्यन्त चालणार आहे. या प्रशिक्षणात लेखी व मैदानी प्रशिक्षणाचा अंतर्भाव असणार आहे.या प्रशिक्षण शिबिरात मुंबई मधील तज्ञ मार्गदर्शक प्रशिक्षण देणार आहेत. तरी सर्वांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजना संदेश सावंत आणि संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांनी केले आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क संदीप तांबे 9422565280, प्रशांत बोभाटे 9423311079 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कणकवली कॉलेज येथे ५ डिसेंबरला मोफत भरती पूर्व प्रशिक्षण…
