*पर्यटकांनी आंबोलीकडे फिरविली पाठ
*💫आंबोली दि.२९-:* कोरोनाच्या पुन्हा येणाऱ्या नवीन लाटेमुळे लॉकडाऊनच्या बातमी मुळे आंबोलीतील रविवारच्या वर्षांपर्यटनावर परिणाम झाला आहे. असंख्य पर्यटकांनी आंबोलीकडे पाठ फिरविलेली दिसून येत आहे. त्यामुळे याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम होत आहे. गोवा सिमेवर तपासणी केंद्र पुन्हा सुरु केल्यामुळे आंबोलीत येणाऱ्या पर्यटकात पुन्हा घट झाली आहे. त्यामुळे व्यवसाईकात नाराजी निर्माण झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबईतील आजरा मार्गाने येणारे पर्यटकांची संख्या सुद्धामंदावली आहे. तीन दिवस सलग सुट्टी असुन सुध्दा पर्यटक बाहेर पडत नाही. कोरोनाची दुसरी लाट येणार हे जाहीर केल्याने पर्यटक धास्तावले आहेत. खबरदारी म्हणून मास्क बांधून संरक्षण म्हणून काळजी घेताना दिसत आहे.