कंटेनरची कारला धडक, कारचे मोठे नुकसान…

कणकवली : कोल्हापूरहून फोंडाघाटच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरची कारला धडक बसली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, वाहनांचे विशेष कारचे नुकसान झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळच्या वाजण्यास सुमारास फोंडाघाट येथील एका हॉटेलसमोर झाला.

कंटेनर चालक मोहम्मद सोहेल खान (४२, रा. मध्य प्रदेश) हा आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन घाटमार्गातून फोंडाघाट दिशेने येत होता. तर कार चालक दत्तू खंडू पारधी (४९, रा कोल्हापूर) आपल्या ताब्यातील कार कोल्हापूरच्या दिशेने जात होता, तेव्हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच कॉन्स्टेबल सचिन माने व संतोष शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अपघाताची कणकवली पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरा सुरू होती.

You cannot copy content of this page