एसटी वाहतूक नियंत्रक अनाजी गावडे यांचा कथामालेतर्फे सेवानिवृत्तीपर सत्कार…

⚡मालवण ता.०५-:
मनमोकळा स्वभाव आणि सेवामयी वृत्तीने प्रवाशांमध्ये लोकप्रिय झालेले आचरे येथील एसटी वाहतूक नियंत्रक अनाजी गावडे यांचा साने गुरुजी कथामाला शाखा मालवणच्या वतीने सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.

साने गुरुजी कथामाला मालवण दरवर्षी सेवामयी कर्मचाऱ्यांचा सत्कार करते. एसटी वाहतूक नियंत्रक कक्ष आचरे येथे वाहतूक नियंत्रक अनाजी गावडे यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह, आणि सानेगुरुजींचे श्यामची आई पुस्तक भेट देऊन गावडे यांचा कथामालेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, सुगंधा गुरव, रामचंद्र कुबल,पांडुरंग कोचरेकर, सुरेंद्र सकपाळ, रमाकांत शेट्ये, संजय परब, सायली परब,कामिनी ढेकणे, नेहा बापट आदी उपस्थित होते.

बहुजन हिताय,बहुजन सुखायं ‘हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य अनाजी गावडे यांनी आचरे येथे आठ महिने वाहतूक नियंत्रक म्हणून सेवा करताना अक्षरश: साकार केलेले आहे, असे उद्गगार सुरेश ठाकूर यांनी काढले.यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अनाजी गावडे यांनी सेवानिवृत्तीबद्दल सत्काराने मी भारावून गेलो असून या सत्काराबद्दल संस्थेचा मी आभारी आहे, असे सांगितले.

You cannot copy content of this page