माजी विद्यार्थ्यांकडून भंडारी हायस्कुलला खुर्च्या भेट…

⚡मालवण ता.०५-:
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या सन १९९७-९८ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळा व शाळेच्या ग्रंथालयासाठी २१ हजार ६०० रुपये किंमतीच्या २९ खुर्च्या भेट दिल्या आहेत.

भंडारी हायस्कुलच्या शैक्षणिक वाटचालीत माजी विद्यार्थ्यांचे नेहमी सहकार्य लाभत आहे. शाळेसाठी खुर्च्या देण्यासाठी १९९७-९८ साल च्या बॅचचे माजी विद्यार्थी दिगंबर केळूसकर वं त्यांच्या सहकारी वर्गमित्रांचे सहकार्य लाभले. या कामी भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी पाठपुरावा केला. या खुर्च्या शाळेला सुपूर्द करण्यात आल्या, त्यावेळी माजी विद्यार्थी दिगंबर केळूसकर, संतोष गोसावी, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page