सावंतवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिन…

⚡सावंतवाडी , दि- ०२:- जयानंद मठकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी येथे शिवराज्याभिषेक दिन ६ जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. विविध प्रकारचे कार्यक्रम व व्याख्याने आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते श्री मुकुंद सीताराम कामत म्हणून , तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रशांत जयानंद मठकर संस्थेचे प्राचार्य, उपप्राचार्य, गटनिदेशक व सर्व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page