⚡बांदा ता.०२-: शेर्ले येथे तेरेखोल नदीपात्रात आपल्या कुटुंबासह आंघोळीसाठी उतरलेला सात वर्षीय बालक हा बेपत्ता झाला आहे. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीने होडीच्या सहाय्याने बालकाचा शोध घेण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, या बालकाचे कुटुंबीय शेरले येथे मंदिराचे काम करत आहेत. आज सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास बालक हा आपल्या कुटुंबीयांसह तेरेखोल नदीपात्रात आंघोळीसाठी उतरला होता. तेरेखोल नदीच्या पाण्याचा प्रवाह हा वेगवान असल्याने हा बालक नदीपत्रात गटांगळ्या खाऊ लागला. कुटुंबीयांसमोरच हा बालक पाण्यात बुडाला. कुटुंबियांनी मदतीसाठी आरडाओरडा केली. मात्र नदीपात्र हे खोल व विस्तीर्ण असल्याने तो नदीच्या पाण्यात बुडाला.
बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीने नदीपात्रात शोधाशोध सुरू आहे. पाण्याचा प्रवाह जलद असल्याने शोध मोहीम राबवण्यासाठी होळी मागवण्यात आली आहे.
तेरेखोल नदीपात्रात आपल्या कुटुंबासह आंघोळीसाठी उतरलेला सात वर्षीय बालक बेपत्ता …
