कुणाल शृंगारे यांच्या दणक्यानंतरभटवाडीतील गटाराचे काम अखेर सुरू…

⚡सावंतवाडी ता.१९-: भटवाडी गोविंद चित्र मंदिर येथील गेले महिनाभर रडतखडत सुरू असलेले काम तत्काळ सुरू करण्यासाठी संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कुणाल शृंगारे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका अधिकारी व संबंधित ठेकेरादाला जाब विचारण्यात आला. यावेळी आज रात्रीपासून काम सुरू करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, माजी नगरसेवक आनंद नेवगी, शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, माजी नगरसेवक सुनील पेडणेकर, भैय्या सावंत, गौरव रामाने, संदेश मोर्ये, संतोष खंदारे, साईराज सुभेदार, बंड्या केरकर, भरत परब, प्रसाद परब, बंड्या परब, विजय मुद्राळे, मुन्ना तुयेकर आदी उपस्थित होते. भटवाडी येथे बंदिस्त गटाराचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. अतिशय संथगतीने हे काम सुरू आहे. गेल्या आठ दिवसांपासून तर काम पूर्णतः बंद करण्यात आले आहे. खोदकाम केल्यामुळे याठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कुणाल शृंगारे यांच्यासह सहकाऱ्यांनी सोमवारी नगरपालिका अधिकाऱ्यांना बोलावून घेत गटाराचे काम मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन ठेकेदार नाईक यांच्याकडून देण्यात आले.

You cannot copy content of this page