खा राऊत यांची यशवंतराव भोसले स्कूलमधील कोविड सेंटरला दिली भेट…

सावंतवाडी दि.२७ एप्रिल (प्रतिनिधी) खासदार विनायक राऊत यांनी यशवंतराव भोसले स्कूल मधील कोविंड केअर सेंटरला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी कोविड सेंटर मध्ये काही अडचण असल्यास सांगावी असे त्यांनी संबंधित डॉक्टरांना निर्देश दिले.

 खासदार विनायक राऊत यांनी आज चराटा येथील भोसले स्कूल मधील कोविड आरोग्य सेंटरला भेट देऊन आढावा घेत आणि चर्चा केली.
यावेळी रूची विनायक राऊत, तहसीलदार राजाराम म्हात्रे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदार राऊत यांनी खास भेट देऊन या ठिकाणी आलेल्या रुग्णांचा आढावा घेतला तसेच काही अडचणी आहेत किंवा कसे याबाबत चर्चा केली यावेळी डॉक्टरांनी त्यांना माहिती दिली आणि या सेंटरमध्ये सुरळीत सेवा सुरू आहे असे सांगितले भोसले स्कूलमध्ये १०० बेडे्ड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page