आंबोली,ता.१३:येथील घाटातील पाठीवरची बॅग गहाळ झाल्याप्रकरणी आंबोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्याची माहिती हवालदार दीपक शिंदे यांनी दिली आहे.अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, आंबोली धबधब्यासमोर दुचाकी थांबवून कठद्यावर स्याक(बॅग) ठेऊन त्यातील बाटलीतून दोघा लहान मुलांना पाणी देण्यासाठी कागल येथील सचिन गाडेकर थांबले होते. तेवढ्यात मोबाईल वर फोन आला.१५ मिनिट बोलल्यानन्तर मुलांना गाडीवर बसवले. आणि बॅग तिथेच विसरून आंबोलीला गेले.अर्ध्या तासानंतर लक्षात आल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याठिकाणी बॅग आढळून आली नाही. त्या बॅग मध्ये त्यांचे सोन्याचे दागिने आणि मंगळसूत्र असे तीन तोळ्याचे ऐवज आहेत. कागल येथून सचिन गाडेकर हे आपल्या दोन लहान मुलांना मोटर सायकल वरून समुद्राजवळ फिरायला गेले होते. तेथून येताना दुपारी 3 वाजता मुख्य धबधब्या समोर बाथरूम च्या बाजूच्या कठद्या जवळ ते थांबले होते. त्यावेळी स्याक त्यांनी कठद्यावर ठेऊन मुलांना पाणी दिले. तेवढ्यात एक फोन आला आणि मोबाईल वर ते १५ मिनिट बोलल्यानन्तर त्या गडबडीत मुलांना गाडीवर बसवले अन जायला निघाले. आंबोली आजरा फाटा येथे आल्या नंतर त्याच्या लक्षत आले पुन्हा त्याठिकाणी जाऊन बघताना तेथे बॅग आढळून आली नाही. त्यांनतर आंबोली पोलीस स्थानक मध्ये त्यांनी माहिती दिली. यांनतर हवालदार मनीष शिंदे आणि लक्ष्मण काळे यांनी पाहणी केली.घाटातील स्टॉल धारकांनी शोधशोध करण्यात मदत केली. यांनतर आज सकाळी आंबोली बचाव पथकाने घाटात खाली उतरून शोध घेतला मात्र सापडली नाही. सदर बॅग आणून देणाऱ्यास योग्य ते पारितोषिक देण्यात येईल असे आंबोली पोलिसांनी आवाहन केले आहे.
आंबोली घाटातील दागिने असलेली बॅग गहाळ झाल्याचा गुन्हा दाखल…
