मालवण दि प्रतिनिधी
कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर या शाळेचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्व १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा यावर्षीही शंभर टक्के निकाल लागला आहे.
या शाळेतून भूमिका सदानंद कोचरेकर हिने ९१ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तर संचिता संदेश परब (८९. ८० टक्के) द्वितीय क्रमांक आणि कुमार राज केशर जुवाटकर (८६ टक्के) तृतीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समितीचे अध्यक्ष शेखर राणे, सचिव जी. एस. परब, खजिनदार शरद परब, सर्व संचालक, शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, सर्व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, पालक शिक्षक संघ यांनी अभिनंदन केले.