कणकवली : नुकताच इयत्ता दहावीचा ssc परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये कणकवली विद्यामंदिर हायस्कूल चा निकाल ९८.९७% टक्के लागला आहे.
यामध्ये . विधी विरेंद्र चिंदरकर ९९.४०% व धृव आनंद तेंडुलकर ९९.४०% गुणांनी प्रथम अथर्व परशुराम कोचरेकर ९८.६०% गुण मिळवून द्वितीय आला आहे. तर कु. देवश्री गुरुनाथ वालावलकर ९८.२०% गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. प्रशालेतून एकूण १९३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी १९१विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.