ऑनलाईन पद्धतीने साधला संवाद; तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक होते उपस्थित
*💫सावंतवाडी दि.२७-:* सावंतवाडी तालुक्यात आज पंचायत समिती सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संजना सावंत यांच्या उपस्थितीत जल जीवन मिशन संदर्भात आढावा बैठक घेतली आहे. या आढावा बैठकीस तालुक्यातील पंचायत समिती सदस्य, प्रत्येक गावचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर ही बैठक ऑनलाईन द्वारे पार पडली आहे. यावेळी जल जीवन मिशन मधून तालुक्यातील प्रत्येक गावात, वाडी वस्तीत योग्य प्रकारे आणि शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी शासनाकडून जल जीवन मिशन राबवण्यात येत असून, यासाठी येत्या ८ दिवसात प्रत्येक गावाने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी १८ गावाचे प्रस्ताव आले असून, ते परिपूर्ण नसून, ते देखील परिपूर्ण करावेत असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, शर्वणी गावकर, पंचायत समिती सभापती निकिता सावंत, उपसभापती शीतल राऊळ आदी उपस्थित होते.
