नगरपंचायत कोव्हीड केअर सेंटर लोकार्पण साठी त्वरित परवानगी द्या…

राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबीद नाईक यांची मागणी

कणकवली : कणकवली नगरपंचायत च्या वतीने उभारलेल्या 25 बेडच्या सुसज्ज कोव्हीड केअर सेंटरमध्ये रुग्ण दाखल करून घेण्यासाठी अद्याप प्रशासनाने मान्यता दिली नसून शहरातील वाढती कोरोनरुग्ण संख्या पाहता नगरपंचायत च्या कोव्हीड केअर सेंटर ला तात्काळ मंजुरी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा नगरसेवक अबीद नाईक यांनी केली आहे. कणकवली शहरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. कोव्हीडबाधित रुग्णांना अलगिकरण कक्षात ठेवल्यास होणार प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. त्यादृष्टीने कणकवली नगरपंचायत च्या वतीने मुडे डोंगरी येथील पर्यटन सुवीधा केंद्राच्या जागेत 25 बेडचे सुसज्ज कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र प्रशासकीय मान्यता मिळाल्याशिवाय कोव्हीड केअर सेंटरचे लोकार्पण करता येत नाही.त्यामुळे त्वरित तशी मान्यता मिळावी अशी मागणी अबीद नाईक यांनी केली आहे.

You cannot copy content of this page