खडपडे येथे १२ मे पासून ३ दिवस धार्मिक उत्सव ;प्राणप्रतिष्ठा कलशरोहन सोहळा…

आंबोली,ता.९: खडपडे येथील श्री देव मल्लनाथ, सातेरी,भावई,भूतनाथ,वेताळ व लिंग सहपरीवार देवता स्थिर प्रतिष्ठा,श्री देव मल्लनाथ प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा १२ मे ते १४ मे रोजी कार्यक्रम.आयोजित करण्यात आले आहेत.१२ मे सोमवारी,प्रायश्चित,पुण्याहवाहन,जलाधीवास.१३मे रोजी प्राकार शुद्धी,मुख्य देवता स्थापन,वास्तु गृह यज्ञ,पर्याय होम.१४मे रोजी प्राकार शुद्धी,स्थापित देवता पूजन,शिखर स्थापना,देवता स्थिर प्रतिष्ठा,बलिदान,पूर्णहुती,गाऱ्हाणे,आरती,महाप्रसाद.बुधवारी कलशरोहन व मूर्ती प्रतिष्ठापण सोहळा सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी होणार आहे.चौकुळ, कुंभवडे,खडपडे मानकरी तसेच शिमधडे, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page