खासदार-आमदार जोडगळीने फोटोसेशन नकरता जनतेला सुविधा द्याव्यात;मनसेच्या अमित इब्रामपुरकर यांची टिका
💫 *मालवण दि.२७-:* मालवण तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आरोग्य व्यवस्थेची दैनावस्था झाली असून कोरोनाची पहिली लाट येऊन गेल्यावर दुसरी लाट येऊन ठेपली असताना मध्यंतरीच्या काळात कोणताही उपाययोजना केली नाही.रस्त्यांच्या १३० कोटीतले ४ कोटी रुग्णालयासाठी खर्च केले असते तर आज अनेक लोकांचे जीव वाचले असते. मालवण तालुक्यातील रिक्त असणारी आरोग्याची पदे भरणे गरजेचे असून असताना आमदार-खासदार या जोडगोळीने फक्त फोटोसेशन न करता जनतेसाठी आरोग्य सुविधा सक्षम करण्याबरोबरच नविन डाॕक्टर, महिला डाॕक्टर,नर्स,आरोग्य सेवक,औषध निर्माण अधिकारी,आरोग्यसेविका,परिचर यांना तात्काळ कंत्राटी पद्धतीने का होईना नियुक्तिपत्र देण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करावेत असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
