पुण्यातील तरुण पर्यटकांना दादागिरी पडली महागात…

सी एन जी भरण्यासाठी आले असताना कर्मचारी, स्थानिकांना केली मारहाण:स्थानिकांनीही आक्रमक होत दिला चोप:पळून जाण्याची ओढवली नामुष्की..

ओरोस ता २
पुण्याहून जीवाचं गोवा करून पुण्याला परत जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका सीएनजी पंपावर केलेली दादागिरी या सर्व पर्यटकांना महागात पडली आहे. गोव्यातील नशा सिंधुदुर्गात उतरली. मात्र हे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याने आणि त्यांचे भविष्य बाद होऊ नये या उदात्तहेतूने जिल्हा वाशीयांनी त्यांना केवळ चोप देऊन सोडून दिले.
पुणे येथून काही तरुण पर्यटक गोव्याला पर्यटनासाठी गेले होते. गोव्यात पर्यटन केल्यानंतर हे पर्यटक सिंधुदुर्ग मार्गे पुन्हा गोव्याला जाण्यासाठी निघाले. हे पर्यटक सिंधुदुर्गातील एका सी एन जी पेट्रोल पंपा वर सी एन जी भरण्यासाठी थांबले. या पंपावरील कर्मचाऱ्यांनी सीएनजी भरण्यासाठी गाडीत असलेल्या सर्वांना खाली उतरण्यास सांगितले. मात्र हे सर्व पर्यटक खाली उतरण्यास तयार झाले नाहीत. त्याबरोबरच त्यांनी त्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला शिव्या देण्यास सुरुवात केली. यानंतर तिथे उपस्थित असलेल्या काही जणांनी गाडीतून खाली उतरलात तरच सीएनजी भरला जाईल, असे सांगितले. मात्र त्यांनाही ते ऐकले नाहीत. उलट शिव्या देत त्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. हे पाहताच आजूबाजूच्या रिक्षाचालक तसेच स्थानिक आदींनी संबंधित पर्यटकांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनाही त्यांनी महाराणा करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर दोनदा ईरटीका कार मधून आलेल्या सर्व पर्यटकांनी खाली उतरून पुणे पर्यटकांना मारण्यास सुरुवात केली. यावेळी या पंपावर मोठा राडा झाला. शेवटी यातील काही पर्यटकांनी आपल्या गाड्यांमध्ये बसून तिथून पळ काढला मात्र पाच ते सहा जण स्थानिकांच्या हातात सापडले. त्यांना स्थानिकांनी चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र हे सर्व पर्यटक तरुण आणि महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांचं भवितव्य अंधारात जाऊ नये असा उदात्त हेतू ठेवत या सर्व पर्यटकांना अखेर सोडण्यात आले. मात्र या राड्यामध्ये गाड्यांचे नुकसान झाले.

You cannot copy content of this page