पाट हायस्कूल मध्ये वसुंधरा सप्ताहाचे आयोजन…

वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता..

कुडाळ : तालुक्यातील पाट हायस्कूल मध्ये वसुंधरा सप्ताह साजरा करण्यात आला. या सात दिवसात विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये वृक्षारोपण वृक्षसंवर्धन साफसफाई, जल स्त्रोतांची सफाई, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये मुले सर्व शिक्षकांचा चांगला सहभाग लाभला.
वसुंधरा विषयावर आधारित. Reduce. Reuse. Recycle च्या विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये शेवटच्या दिवशी सफाई अभियान वसुंधरा बचाव अभियान, वृक्षलागवड असे उपक्रम राबविण्यात आले. संस्था उपाध्यक्ष दिगंबर सामंत आणि राजेश सामंत याच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोदर, शिक्षक प्रतिनिधी तानाजी काळे , कला शिक्षक संदीप साळसकर व इतर शिक्षक उपस्थित होते . वसुंधरा सप्ताहा मध्ये घेतलेला विविध उपक्रमांचे संस्था संचालक आणि शालेय प्रशासन यांने कौतूक केले. एक मे महाराष्ट्र दिनी या उपक्रमाची सांगता झाली.

You cannot copy content of this page