एसपीएस फार्मसी कॉलेजच्या एनएसएस शिबिराची यशस्वी सांगता…

तळगाव येथे आयोजित शिबिरात राबविले अनेक ऊपक्रम..

कुडाळ : श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी, कुडाळ यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिराचा यशस्वी समारोप २६ एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पडवे (तळगाव) येथे झाला.
चार दिवस चाललेल्या या शिबिरात स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडले.शिबिरादरम्यान समाज विकास साधण्यासाठी स्वच्छता मोहिम, परिसर सुशोभीकरण, वंचितांसाठी उपक्रम यांचा समावेश होता. आरोग्य व स्वच्छता जनजागृती अंतर्गत स्वच्छता प्रशिक्षण आणि आरोग्यविषयक संवाद कार्यक्रम घेतले गेले.
सामाजिक जनजागृतीसाठी व्यसनमुक्ती, पर्यावरण संरक्षण आणि महिला सक्षमीकरणावर आधारित मोहिमा राबवण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी नेतृत्वगुण, टीम वर्क आणि संवाद कौशल्य यावर आधारित कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. सांस्कृतिक देवाण-घेवाण व एकात्मतेला चालना देण्यासाठी प्रत्येक संध्याकाळी लोककला, नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक उपक्रमात सेवेचा आत्मा आणि समाजासाठी समर्पणाची भावना ठळकपणे जाणवली.
स्थानिक ग्रामस्थांनी NSS स्वयंसेवकांच्या कामाचे कौतुक करत मन:पूर्वक आभार मानले. शिबिराने केवळ गावाला मदत केली नाही तर सहभागी विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणिवा आणि जबाबदारीची भावना दृढ केली.कार्यक्रम अधिकारी महादेव परब यांच्या नेतृत्वात शिबीर यशस्वी पार पडले. शिबीराला तंटामुक्त अध्यक्ष सुरेश दळवी, सरपंच श्रीमती लता खोत, कॉलेजचे प्राचार्य युवराज पांढरे आदि मान्यवरांनी भेट देवुन विविध उपक्रमांचे कौतुक केले

You cannot copy content of this page