⚡मालवण ता.२९-: अभियान आम्ही मालवणीच्या वतीने ‘चला , वाचू आनंदे ! मावळत्या दिनकराच्या साक्षीने’ साहित्यिक उपक्रमा अंतर्गत, गुरूवार १ मे रोजी ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित यांच्या कथा वाचनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मालवण राॅक गार्डन येथे संध्याकाळी ६ ते ७ यावेळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून हे या कार्यक्रमाचे चौथे पुष्प असेल.
या कार्यक्रमासाठी सर्वांना खुला प्रवेश असून साहित्यप्रेमींच्या उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
मालवणात १ मे रोजी साहित्यिका वैशाली पंडित यांचे कथा वाचन…
