शिवसेना (शिंदे गट)पक्षाची 20 एप्रिल रोजी कणकवलीत महत्वाची बैठक…

शिवसेना संपर्कप्रमुख ना. उदय सामंत मार्गदर्शन करणार..

कणकवली : कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (शिंदे गट) या पक्षाची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख ना. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३ वाजता शिवशक्ती मंगल कार्यालय, कणकवली रेल्वे स्टेशन नजीक पार पडणार आहे.

या बैठकीसाठी कणकवली, देवगड वैभववाडी या मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती रहावे, असे आवाहन शिवसेना पक्षाचे उपनेते संजय आग्रे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page