⚡मालवण ता.१७-:
मालवण मेढा येथील श्री काळबादेवी मंदिराचा ११ वा वर्धापन दिन सोहळा दि. २४ व २५ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यानिमित्त दि २४ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वा. धार्मिक विधी श्री देवी पंचायतन याग होमहवन, सायं. ६ वा. पारंपारिक आरती, सायं. ६.३० वा. ब्राम्हणदेव महिला मंडळ, नाद भोळेवाडी, ता. देवगड यांचे समई नृत्य, दि. २५ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६:३० वा. महिला हळदी कुंकू समारंभ, सायं. ५ वा. श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ कांदळगाव देऊळवाडी, मालवण यांचे भजन (बुवा- राजेंद्र कोदे, मृदुंगमणी- बंटी कांदळगावकर, तबला साथ- दत्ताराम डिकवलकर), सायं ६:३० वा. पारंपरिक आरती, सायं ७ वा. श्री देवी पावणाई दिंडी भजन हुमरोसवाडी माळगाव यांचे दिंडी भजन होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आई काळबादेवी मंदिर विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.