मालवणात २७ रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा…

मालवण (प्रतिनिधी)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, बार्टी, बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने २७ एप्रिल रोजी सकाळी वाजता बॅ.नाथ पै सेवांगण मालवण येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धा गट पहिला -( सातवी ते बारावी), गट दुसरा – खुला गट अशा दोन गटात होणार आहे. गट पहिला (सातवी ते बारावी)- भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व अधिकार तर गट दुसरा (खुला गट )- भारतीय संविधानाची ७५ वर्षे असे विषय देण्यात आले आहेत. पहिल्या गटासाठी वेळ -सात मिनिटे तर दुसऱ्या गटासाठी वेळ – आठ मिनिटे देण्यात आली आहे. पहिल्या गटातील विजेत्यांना १००० रु., ७०० रू., ५०० रु., तसेच प्रशस्तीपत्रक, तर खुल्या गटातील विजेत्यांना १५०० रु., १००० रु., ७०० रु. तसेच प्रशस्तीपत्रक व उत्तेजनार्थ क्रमांक प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी लक्ष्मीकांत खोबरेकर ९४२२९४६२१२ व संग्राम कासले ९४२०८२४८७४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page