पोईप नाटकुळवाडी येथील ग्रामस्थांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश…

⚡मालवण ता.१६-:
मागील कित्येक वर्षे पोईप नाटकुळवाडी रस्त्याचे काम झालेले नसून सदर रस्ता अतिशय खराब झालेला आहे. मागील १० वर्षे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडे वाडीतील ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामासाठी वारंवार मागणी व पाठपुरावा केला होता. परंतु मागील १० वर्षात कोणतीही विकास कामे झालेली नसल्याने याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

भीमसेन तळकर, सुभाष गोसावी, मंगेश महाजन, चंद्रकांत मोहिते, गणेश परब, उमेश तावडे, लक्ष्मण तावडे, अभिषेक तावडे, विवेक तावडे, प्रतापसिंह सावंत, संतोष तावडे, बाबाजी सावंत, एकनाथ परब, साबाजी परब, सुनील मोहिते, सुधाकर गोसावी, महेश नाईक, अक्षय मोहिते, विकास चव्हाण, कृष्णा माधव, पंकज नाईक, सूर्यकांत नाईक, प्रकाश पालव, भिवा नाईक, रमेश पालव व परशुराम नाईक आदी ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

यावेळी ग्रामस्थांनी प्रामुख्याने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे रस्ता कामाची मागणी केली. येत्या काही दिवसात शक्य तेवढा रस्ता खडीकरण डांबरीकरण करून देण्याचे आश्वासन यावेळी दत्ता सामंत यांनी दिले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात दत्ता सामंत यांच्यासोबत माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, पोईप सरपंच श्रीधर नाईक, पोईप शिवसेना शाखाप्रमुख नारायण (पपू ) राणे, पोईप गाव प्रमुख परशुराम नाईक, पोईप भाजप कार्यकारणी अध्यक्ष बाळा पालव व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page