पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिल्या परशुराम उपरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.!
कणकवली : माजी आ. परशुराम उपरकर यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला. दरम्यान वाढदिवसानिमित्त माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन माजी आ. परशुराम उपरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार वैभव नाईक, राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, गौरीशंकर खोत आदी उपस्थित होते.